बुधवार, ९ सप्टेंबर, २००९

या उठाठेवीचा उद्देश

ग्रंथालय आणि माहितीशास्त्र यासंदर्भातील माहितीचे संप्रेषण मराठीतून करता यावे यासाठीची ही उठाठेव। जरी हे स्थळ ग्रंथालय आणि माहितीशास्त्राशी संबंधित असले तरी केवळ ग्रंथालयशास्त्राचे विद्यार्थी, शिक्षक अथवा ग्रंथालय व्यावसायिक यांच्यापुरतेच हे स्थळ मर्यादित नाही। वाचनात रस असलेल्या प्रत्येक घटकाला यात सहभागी होता येईल। होणारी चर्चा आशयघन, अभ्यासू आणि वाचनीय असावी एवढीच अपेक्षा।

भारतीय ग्रंथालयांविषयी चर्चा अपेक्षित असली तरी तसा नियम नाही किंवा ती मर्यादाही
नाही।

चर्चा प्राधान्याने मराठीत व्हावी याचा अर्थ इंग्रजीचा वापर करायचाच नाही असा मात्र नाही। स्पष्टच लिहायचे तर संत ज्ञानेश्वर आज असते तर त्यांनीही "आता विश्वात्मके देवे" लिहिताना " आता युनिव्हर्सल देवा " असेच लिहिणे पसंत केले असते, कारण विश्वात्मक शब्दापेक्षाही युनिव्हर्सल हा शब्द लवकर समजला असता। समर्थ रामदासांच्या काळात प्रचलित असणारी मराठी फारसीमय होती म्हणूनच त्यांच्या मराठीतून लिहिलेल्या दासबोधात कितीतरी फारसी शब्द सापडतात। आज आपण इंग्रजाळलेल्या मराठीत बोलतो नि तेच अधिक चांगले समजते। म्हणूनच मराठीचा समजेल असाच वापर करायचा। आवश्यक तिथे इंग्रजी शब्दही वापरायचे नि नवीन मराठी शब्द वापरलाच तर त्याचा इंग्रजी अर्थही सोबत द्यायचा। एखाद्याने त्या मराठी शब्दाबद्दल काही वाद निर्माण केलाच तर त्याला योग्य ते नि सभ्यतेचे शिष्टाचार पाळून उत्तर द्यायची जबाबदारीही घ्यायची। एवढेच की देवनागरी लिपीचे वळण हिन्दी शैलीचे असल्याने काही शब्दांबद्दल परकेपणा वाटत राहील। विशेषत: मराठीतल्या 'ण' साठी कधी कधी 'न' तर मराठीतल्या 'ळ' साठी कधी 'ल' वाचावा लागेल आणि मराठीतल्या पूर्णविरामाच्या जागी बहुतेकदा "।" गृहित धरून चालायचा। मग उरलेली भाषा आपलीच.

तात्पुरते ( प्रस्तावना, या ब्लॉगविषयी, सदस्य व्हा, संपर्क दूवा, सेट अभ्यासक्रम )  हे दुवे (बटने) कार्यान्वित केलेले नाहीत. लिंक्स जोडण्याचे काम झाल्यावर  भविष्यात हे दुवे कार्यान्वित होतील.

असाच एक प्रयत्न  (  http://indian-bibliophile.webs.com/ ) इंग्रजीतील एक ब्लॉग  तयार करून मराठी व इंग्रजीतून एकाच वेळी चर्चा करता यावी यासाठी केला आहे.